सोग्रस ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार 2019-2020

ग्रामस्थांनी एकीतून केला कायापालट ; पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव
सध्या केंद्र व राज्य शासनामार्फत स्वच्छतेबाबत विविध योजना राबविल्या जात असून यामध्ये कोट्यावधींची प्रोत्साहन बक्षिसे देवून गावोगावी स्वच्छतेची चळवळ उभी होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आदर्श गाव निर्माण करण्याचे ध्येय ठेवलेल्या सोग्रस गावाला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे नुकताच सन २०१९-२०२० चा “तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार”प्रदान करण्यात आला.
७५ व्या स्वातंत्र्यदिनी मा.विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे मा.ना.श्री.छगन भुजबळ साहेब अन्न,नागरी,पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती. लीना बनसोड, जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब क्षिरसागर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. रविंद्र परदेशी यांच्या उपस्थितीत
सोग्रस ग्रामपंचायतीला तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करून सरपंच श्री परशराम गांगुर्डे, ग्रामसेवक श्रीम.पुष्पा भोये, उपसरपंच सौ. मीरा शिंदे, माजी आजी सरपंच, उपसरपंच सदस्य सह ग्रामस्थांना सन्मानित करण्यात आले.
