प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) – माता आणि बालकांचे आरोग्य संरक्षण
योजनेचा उद्देश:
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या पोषणाची गरज पूर्ण करणे, आणि मातेचे व बालकाचे आरोग्य सुरक्षित करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते.
- गर्भवती महिलेला ₹5,000/- पर्यंत आर्थिक मदत तीन हप्त्यांत दिली जाते.
- पहिल्या बाळाच्या जन्मावेळीच हा लाभ दिला जातो.
- लाभार्थी महिलेला नियमित आरोग्य तपासणीसाठी, लसीकरणासाठी आणि पौष्टिक आहारासाठी प्रोत्साहन.
- गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या माता.
- पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ही योजना लागू.
- महिला 19 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या असाव्यात.
- महिला सरकारी सेवेत नसाव्यात (सरकारी कर्मचारी लाभार्थी नाहीत).
- महिला भारतीय नागरिक असावी.
| हप्ता | अटी | देय रक्कम |
|---|---|---|
| पहिला | गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर | ₹1,000/- |
| दुसरा | किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) केल्यावर | ₹2,000/- |
| तिसरा | बाळ जन्मानंतर लसीकरण पूर्ण केल्यावर (BCG, OPV, DPT, HepB) | ₹2,000/- |
- गर्भवती महिलेचा आधार कार्ड
- बँक खाते तपशील (महिलेच्या नावावर)
- गर्भधारणेचा नोंदणी पुरावा (ANM / आरोग्य केंद्र प्रमाणपत्र)
- जन्म प्रमाणपत्र (बाळासाठी)
- लसीकरण प्रमाणपत्र
- जवळच्या आंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात संपर्क साधा.
- PMMVY फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करा.
- पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर निधी थेट बँक खात्यावर जमा होतो.
- महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र
- अंगणवाडी सेविका / आशा कार्यकर्ती
- माता व बाळाच्या पोषणासाठी आर्थिक मदत
- सुरक्षित मातृत्वासाठी प्रोत्साहन
- महिलांचे आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहन
- लसीकरण आणि आरोग्य सेवा वापरण्यासाठी प्रेरणा