
गावाचा इतिहास :
प्राचीन काळात राम व लक्ष्मण वनवासात नाशिककडे जात असताना रामाचा शेला बंधू लक्ष्मणांने नदीवरती धुतला असता, या नदीस शेलू असे नाव दिले गेले. तसेच पुढे आल्यानंतर सोग्रस गावाच्या नावाची आख्यायिका म्हणजे सोग्रस गावातील लोकांनी राम, लक्ष्मण व सीता यांना सुग्रास जेवण दिले. त्यामुळे या गावाचे नाव सुग्रास – सुग्रासाणे – सोगरसाणे गावाच्या नावात असा बदल होऊन आता सोग्रस या नावाने ओळखले जाते.
vदुसऱ्या महायुद्धात थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद मा. किसनराव शिवराम गांगुर्डे यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते.