गावाचे स्थान व विस्तार :
नाशिक जिल्हापासून पूर्व दिशेला ५४ कि.मी अंतरावर तसेच चांदवड तालुक्यापासून पश्चिम दिशेला आणि सह्याद्रीच्या सातमाळ डोंगरांगांपासून १० कि.मी. अंतरावर सोग्रस गाव वसलेले आहे, आणि राष्ट्रीय महामार्ग क्र.३ मुंबई – आग्रा व विंचूर- प्रकाशा (भावडबारी ते सोग्रस ) या महामार्गवर सोग्रस हे गाव आहे. शेलू नदी सातमाळ डोंगररांगातून वाहत येऊन सोग्रस गावाच्या पश्चिम बाजूने वळसा घालून पुढे दक्षिणेला वाहत जाते. सोग्रस गावाचे क्षेत्रफळ ३०५.८९ हेक्टर इतके आहे.
सातमाळ डोंगररांगा या गावातून स्पष्टपणे दिसतात.
